लोणावळा : बंगालवरून लोणावळ्यातील एका तरुणाच्या दुकानातील गुगल पे खात्यावर 18 हजार रुपये ट्रान्सफर झाले. दुकानात कोणीही गिर्हाईक नाही व कोणाकडून पैसे देखील येणे नाही मंग पैसे पाठविले कोणी
लोणावळा : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा व खासगीकरणाच्या विरोधात आज संपुर्ण देशात एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. लोणावळा व लोणावळा परिसरातील सर्व पोस्ट कार्यालये बंद ठेवत पोस
खोपोली (प्रतिनिधी) : खोपोली पोलीस हद्दीतील राज इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल दुकानात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शटरचे कुलूप तोडून पाच मोबाईल चोरून दोन इसम पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम व डीबी टीम यांना तपास करण्यासाठी आदेशित केले. 19 जुलै रोजी सदरची घटना घडली होती. या घटनेच्या अनुषंगाने घटना घडलेल्या रात्रीच्या वेळेतील रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील बाहेर जाणाऱ्या रस्त्या लगतचे कॅमेरे तसेच त्यावेळेस शहरात आलेली संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली आणि माहिती घेण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान घरफोडी करणाऱ्या दोन इसमांची अस्पष्ट छायाचित्रे समोर आली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधार व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून 6 ऑगस्ट रोजी घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांचा शोध घेण्यात खोपोली पोलिसांना यश आले. सदर गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एक आरोपीत हा मर्डरच्या गुन्ह्यात बारा वर्षे शिक्षा भोगलेला असून दुसरा आरोपीत हा मर्डरच्या गुन्ह्यात तब्बल 20 वर्ष शिक्षा भोगून 2021 मध्ये बाहेर आलेला आहे. अशा आरोपींना अतिशय कौशल्य पूर्ण योग्य पद्धतीने ताब्यात घेण्यात टीमला यश आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम यांच्यासह पोलीस हवालदार प्रसाद पाटील, पोलीस शिपाई प्रदिप खरात, रामा मासाळ, दत्ता नुलके, स्वागत तांबे यांनी सदरची कामगिरी बजावली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम हे करत आहेत.
लोणावळा : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात माणुष्कीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेतील निर्भयाच्या कुटुंबियांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते व प्रवक्ते प्रकाश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष गणेश सातपुते, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांशी बोलताना सातपुते यांनी पक्षाच्या वतीने पुढील कायदेशीर व न्यायालीन लढ्यासाठी गरज भासल्यास विशेष कायदे तज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन व मदत पुरवली जाईल असा विश्वास दिला. तसेच त्यांचे सांत्वन करत लवकरात लवकर नराधमाला फाशी देणे हीच निर्भयाला श्रद्धांजली ठरेल असे सांगितले. याप्रसंगी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, पुणे जिल्हा अध्यक्ष रस्ते अस्थापना व साधन सुविधा सचिन भांडवलकर, सुशांत साळवी, उपसरपंच भीमराव दळवी, कोर कमेटी सदस्य अनिल वरघडे, सुरेश जाधव, संजय शिंदे, पांडुरंग असवले, भारत चिकणे, अमित भोसले, संदीप फोटफोडे तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
पुणे : कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत आज सकाळी 11.30 वाजता कोसळले असून यामध्ये एक शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड (वय 22 वर्ष रा. पुणे) किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले. कु. भविका राठोड या सदर अपघातात किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषधउपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. इतर कोणत्याही प्रकारची हानी नाही, घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटनास्थळी ठेवला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनातर्फे प्राप्त झाली आहे.
लोणावळा : खंडाळा येथे संत रोहिदास मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व सल्लागार सुरेश (अण्णा) पांडुरंग गायकवाड यांचे आज बुधवारी सकाळी 7 वा आकस्मित निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी एक वाजता खंडाळा येथील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे. खंडाळा परिसरातील धार्मिक व सामाजिक सांस्कृतिक कार्यात गायकवाड सदैव अग्रेसर असायचे.