Breaking news

मावळ तालुक्यातील भाताच्या ना पेरा झालेल्या क्षेत्रांचा पंचनामा करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : माऊली दाभाडे

लोणावळा : मावळ तालुक्यामध्ये सहा मे पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मे महिन्यामध्ये सुरू झालेला हा अवकाळी पाऊस पुढे मान्सून मध्ये रूपांतरित झाला व तो पाऊस आज पर्यंत पाऊस सुरू आहे. पावसाने विश्रांती न घेतल्यामुळे मावळ तालुक्यामध्ये भाताच्या रोपांची पेरणी शेतकऱ्यांना करता आलेली नाही. मावळ तालुका हा भात शेतीचे आगार म्हणून ओळखला जातो. जवळपास 13 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. पावसामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी मावळ तालुक्यामध्ये भात रोपांची पेरणी करता आलेली नाही. या ना पेरा झालेल्या क्षेत्रांचे महसूल विभागाने पंचनामे करत शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन केली आहे. माऊली दाभाडे म्हणाले जून महिन्यामध्ये मावळ तहसीलदार यांच्याकडे याबाबत मागणी केली होती मात्र त्यांच्याकडून समाधानकारक कार्यवाही झालेली नाही याकरिता जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे शेतकरी वर्गाची ही हाक पोहोचवण्यात आली आहे. मावळ तालुक्यामध्ये पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताची रोपे तयार न झाल्यामुळे भात लागवड मोठ्या प्रमाणात होणार नाही त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. 

      मावळ तालुक्यातील भात पिकासोबतच पुणे जिल्ह्यामधील मुळशी, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव, जुन्नर या खरीप व कोरडवाहू पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे देखील पंचनामे करून त्यांना देखील नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी यावेळी माऊली दाभाडे यांनी केली आहे. यावेळी माऊली दाभाडे यांच्या सोबत ज्येष्ठ नेते बबनराव भोंगाडे, शांताराम लष्करी, गणपत भानुसघरे, भाऊसाहेब बांगर, दत्तात्रय आंद्रे, नाथा गायकवाड, भरत तिकोने, नथू गायकवाड, कैलास गरुड, तुकाराम गायखे, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब नाणेकर, नामदेव खोंडे, रघुनाथ दाभाडे, भरत साठे, अंकुश टाकळकर, सोमनाथ गायकवाड, ज्ञानदेव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

इतर बातम्या