Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरामध्ये बुधवारी मुसळधार पाऊस ! 24 तासात 165 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये बुधवारी 2 जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला आहे. 24 तासांमध्ये 165 मिमी (6.50 इंच) पावसाची नोंद लोणावळा शहरामध्ये झाली आहे. जून महिन्यापासून लोणावळा शहरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी 2 जुलै रोजी सकाळच्या सत्रांत पाऊस हलक्या स्वरूपात होता. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढला आहे आजही पाऊस जोरदार सुरू आहे. 

     लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 2226 मिमी (87.64 इंच) पाऊस झाला आहे. दरवर्षीच्या सरासरीच्या निम्मा पाऊस आतापर्यंत लोणावळा शहरामध्ये झाला आहे. जोरदार पावसामुळे लोणावळा शहरांमधील सकल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. इंद्रायणी नदीपात्रातील पाणी पातळी देखील वाढले आहे. लहान मोठे ओढे व नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत. वाकसई, सदापूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीच असल्यामुळे भात शेती पाण्याखाली गेली आहे. कार्ला मळवली भागात देखील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

इतर बातम्या