Breaking news

कोकणात अत्याधुनिक AI शेती केंद्राच्या स्थापनेसाठी आमदार शेखर निकम यांची शरद पवारांशी चर्चा

चिपळूण : कोकणातील कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेती केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीत आमदार शेखर निकम यांनी सहभाग घेत पवार यांची भेट घेतली व या पुढाकाराचे मनःपूर्वक स्वागत केले.

या बैठकीत AI तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी उत्पादनवाढ, हवामान आधारित स्मार्ट शेती, जलसंपत्ती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या शक्यतांवर सखोल चर्चा झाली. कोकणातील शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून असल्याने तेथील शेतकऱ्यांचे उत्पन्न अनिश्चित असते. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.

आमदार शेखर निकम हे कोकणातील विकासासाठी सातत्याने कार्यरत असून शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी त्यांनी या AI शेती केंद्राच्या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. शेती क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या या उपक्रमामुळे कोकणातील शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, डेटा-आधारित मार्गदर्शन आणि हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

इतर बातम्या

कोकणातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. शेखर निकम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीची भेट; चिपळूण शहरातील विविध समस्या बाबतही दिले निवेदन