Breaking news

राहुल शेट्टी खून प्रकरणातील मुख्य मारेकरी पोलिसांच्या ताब्यात; लोणावळा पोलिसांना मोठं यश

लोणावळा : शिवसेनेचे माजी लोणावळा शहरप्रमुख राहुल उमेशभाई शेट्टी हत्या प्रकरणातील मुख्य मारेकरी इब्राहिम युसुफ खान (वय 30, रा. सैय्यदनगर, हडपसर. मूळ राहणार शहावली मोहल्ला कब्रस्थानसमोर लातूर) व मोहन उर्फ थापा देवबहाद्दर मल्ला (वय 47, रा. बॅटरीहिल, खंडाळ. मूळगाव लुंबिना नेपाळ) या दोघांना लोणावळा शहर पोलिसांनी पुण्यात सापळा रचत ताब्यात घेत अटक केली. या घटनेतील चार आरोपींना लोणावळा पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    काँवत म्हणाले राहुल शेट्टी यांची हत्या झाल्यानंतर त्यांची पत्नी सौम्या राहुल शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज आगरवाल व दिपाली भिल्लारे या दोघांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. त्यांना 31 आँक्टोबर पर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र या घटनेतील मुख्य मारेकरी याला शोधण्याचे मोठे आवाहन पोलीस यंत्रणेच्या समोर होते. मात्र घटनास्थळावरून उपलब्ध झालेले सिसीटिव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती याच्या आधारावर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील व सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकातील पोलीस नाईक नितिन सुर्यवंशी, अमित ठोसर, वैभव सुरवसे, मनोज मोरे, राजेंद्र मदने, अजिज मेस्त्री, राहुल खैरे, पवन कराड यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुण्यात सापळा लावत दोन्ही मुख्य आरोपी ताब्यात घेतले. त्यांनी राहुल शेट्टी यांच्यावर गोळीबार व कुर्‍हाडीने हल्ला केल्याची कबुली दिली आहे. मात्र ही हत्या त्यांनी का व कोणाच्या सांगण्यावरून केली, यामागे काही राजकिय हेतू आहे का, गुन्ह्यात वापरलेले पिस्टल याचा तपास सुरू आहे. 

    सदर गुन्ह्यातील आजुन तीन आरोपी फरार असून त्यांच्या मागावर पोलीस पथके रवाना झाली असल्याचे काँवत यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी लोणावळ्यात भेट देत घटनेचा आढावा घेत तपासाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.

इतर बातम्या