Breaking news

Maval Crime News : कोथुर्णे गावातील अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला शाळेजवळ; आरोपीला 24 तासात अटक

लोणावळा : पवन मावळातील कोथर्णे गावातील एक अल्पवयीन मुलगी अपहरण झाली असल्याची तक्रार काल कामशेत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. आज या मुलीचा मृतदेह गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजुला मिळून आला. या घटनेचा तपास करत कामशेत पोलिसांनी एकाला ताब्यात घेत अटक केली आहे. तेजस उर्फ दादा महीपती दळवी (वय 24 वर्षे) असे या आरोपीचे नाव आहे. कामशेत पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या घटनेची माहिती दिली.

     कोथुर्णे गावातून 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 पासून एक अल्पवयीन मुलगी गायब झाली होती.सर्वत्र शोधाशोद केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी कामशेत पोलीस ठाण्यात मुलीचे घराजवळून अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. सदर प्रकरणाचे गांभीय लक्षात घेवून वडीलांचे तक्रारीवरुन कामशेत पोलीस ठाण्यात भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देवून अपहरण झालेल्या मुलीचा संपुर्ण गावात शोध घेवून तपासाला गती देण्याकरीता पोलीस निरीक्षक अशोक शेळके, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहा पोलीस निरीक्षक आकाश पवार, सपोनि गंधारे, सपोनि बावकर, पोसई चौधरी, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, सपोनि माने, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात वेगवेगळी तपास पथके तयार केली. तपास पथकामार्फत अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरू असताना कोथुर्णे गावातील जि. परिषद शाळेच्या पाठीमागील बाजुस अपहरण झालेली मुलगी ही आज संशयीत रित्या मिळून आली. त्यामुळे गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करत गुन्हा घडले पासून " चोवीस तासाच्या आतमध्ये " आरोपी तेजस उर्फ दादा महीपती दळवी याला जेरबंद करण्यात कामशेत पोलीसांना यश आले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दरम्यान सदर मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती मिळविण्यासाठी तीचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर अनेक घटनांचा उलगडा होईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

    सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहा. पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा फौजदार प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पो हवा हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, पो. ना समाधान नाईकनवरे पो कॉ प्राण यवले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण व सहा फौजदार समीर शेख, पोलीस हवालदार, गणेश तावरे, जितेंद्र दिक्षीत, बनसोडे, विजय राय, पो. ना. हिप्परकर, कळसाईत, आशिष झगडे, रविंद्र राऊळ, होमगार्ड प्रशांत कटके, किसन बोंबले यांचे पथकाने केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय जगताप हे करीत आहेत.

इतर बातम्या

संकल्प नशा मुक्ती अभियान अंतर्गत लोणावळा ग्रामीण व शहर भागात पोलिसांची कारवाई; 3 किलो गांजा व प्रतिबंधित गुटख्यासह सुमारे 3 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त