Karla News l कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भारती मोरे यांची बिनविरोध निवड

लोणावळा : कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती संतोष मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या कार्ला येथे ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात शांततेत पार पडली.
ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच दिपाली दिपक हुलावळे यांनी नियमानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदासाठी अर्ज मागविण्यात आले. या पदासाठी फक्त भारती मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ग्रामसेवक सुरेश सरपाते व तलाठी दिपक धनवडे यांच्या उपस्थितीत निर्णय अधिकारी शिवाजी जाधव यांनी भारती मोरे यांची सरपंचपदी निवड अधिकृतरित्या घोषित केली.
या प्रसंगी माजी सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच अभिषेक जाधव, माजी उपसरपंच किरण हुलावळे, सदस्य उज्वला गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारती मोरे यांना सरपंचपदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाई भरत मोरे, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साईनाथ मांडेकर, लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष नाना जांभळे, कान्हेचे सरपंच विजय सातकर, देवलेच्या सरपंच वंदना आंबेकर, औंढेच्या माजी सरपंच जागृती मांडेकर, गुलाब तिकोने, नंदकुमार पदमुले, सुनिल शिर्के, चंद्रकांत गायकवाड, अनंता ढवळे, काळूराम थोरवे, दिनकर सातकर, सुभाष हुलावळे, ज्ञानेश्वर सोनवणे, लक्ष्मण शिंदे, सतीश मोरे, अंकुश गायकवाड, रज्जाक मणियार, रोहिदास हुलावळे, बाळासाहेब येवले, संभाजी हुलावळे, सुदाम हुलावळे, सचिन वाडेकर, बाबाजी सोंडेकर, विशाल जमदाडे, नितीन वाडेकर, सुनिल सावळे, संजय गायकवाड आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नवीन सरपंच भारती मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.