
Get in on
लोणावळा : मुंबई व पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यावर असलेल्या लोणावळा या पर्यटन स्थळावर सध्या विविध ऑनलाइन कंपन्या आपल्या सेवा सुविधा पुरवत आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या विविध प्रक�
लोणावळा : केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक आज एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्त लोणावळा शहरांमध्ये आले होते. त्यावेळी लोणावळा व्यापारी संघाने त्यांची भेट घेत ब्लिंकिट ह्या ऑनलाईन किराण�
लोणावळा : स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना लोणावळा शहराच्या लगत असलेल्या भैरवनाथ नगर, कुसगाव येथे घडली आहे. या घटनेच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करा अशी संतप्त मागणी सर्व स्तरातून होत आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 172/2025 भा.न्या.सं. क. 64 (2) (एफ), 65(1), सह बालकाचे लैंगिक आपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता कॉक्रीट इंडीया कंपनी जवळ भैरवनाथनगर, कुसगांव बु येथे फिर्यादी व आरोपी यांच्या राहत्या घरात हा किळसवाणा प्रकार घडला आहे. घरात मुलगी एकटीच आहे याचा फायदा घेत नराधाम बापामधील राक्षस जागा झाला व त्याने आपल्या पोटच्या मुलीचा घास घेतला. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासला आहे. स्वतःच्या घरातच मुली सुरक्षित नसतील तर त्यांनी ज्याचे कोठे. ज्या बापावर मुलीची सर्व जबाबदारी असते तोच बाप मुलीवर अशा प्रकारे अत्याचार करत असेल तर तीने सुरक्षेची अपेक्षा करायची कोणाकडे असा प्रश्न या घटनेमुळे उभा राहिला आहे. अत्याचार केल्यानंतर त्या नराधमाने मुलीला या घटनेची वाच्यता केली तर जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली. आई घरी आल्यावर सदर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली मात्र त्या निर्भयाच्या आईने हिंमत करत आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यावरून तिचा नवरा (आडनाव पठाण) आहे. त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे ह्या करत आहेत.
देहूगाव : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालय, देहूरोड येथे ‘अमली पदार्थ विरोध’ दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरुकता निर्माण करण्यात आली. कार्यक्रमास देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त आयुष्याची गरज पटवून दिली. ते म्हणाले, "अमली पदार्थांचे व्यसन हे जीवनाच्या विनाशाचे कारण बनते. त्यापासून दूर राहणे, हे चांगल्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. केवळ स्वतःच नव्हे तर समाजातही या बाबत जागरूकता पसरवायला हवी." विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, "भविष्य उज्वल बनवायचे असेल तर योग्य मार्ग निवडणे अत्यावश्यक आहे. एकदा का चुकीच्या मार्गावर पाऊल पडले, तर पुन्हा योग्य मार्गावर येणे कठीण होते. म्हणूनच सुरुवातीपासूनच अमली पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे." कार्यक्रमास पोलीस हवालदार प्रशांत वाबळे, मयूर घागरे, ऋतुजा सातूरकर, विद्या पवळे, विमल इंदे, पर्यवेक्षिका विभावरी अभंग, सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र काळोखे, क्रीडा शिक्षक निलेश मानकर, अरुण डिंबळे, ज्येष्ठ अध्यापिका शिला राजे, अनिता काळे, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, जबाबदारीची जाणीव आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
पुणे : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानभवन, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वनाज औद्योगिक परिसर, तळेगाव, मुळशी या सहा ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल घेण्यात आले. या सर्व ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पडल्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली. यावेळी विधान भवन परिसरात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, अपर आयुक्त अरुण आनंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री. डुडी म्हणाले, या मॉक ड्रिलमध्ये सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. सुरुवातीला भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर कृत्रिम पद्धतीने स्फोट करण्यात आला, त्यानंतर अश्रू धूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. याप्रसंगी परिसरातील इमारतीत काही लोक अडकले होते, त्यांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य विभाग, अग्निशमन दल व नागरी संरक्षण दल यांनी समन्वयाने काम केले. यानुषंगाने सर्व उपाययोजनेत प्रतिसादाची वेळ योग्य होती. सर्व यंत्रणांनी तात्काळ प्रतिसाद दिला. आरोग्य यंत्रनेने आरोग्य सुविधा रुग्णवाहीका सेवा वेळेत उपलब्ध करुन देण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. अग्निशमन वाहनाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. मॉक ड्रिलची सर्व प्रक्रिया 25 ते 60 मिनिटात पूर्ण करण्यात आली. ग्रामीण भागातील लोकांमध्ये या मॉक ड्रिलद्वारे जनजागृती होण्यासाठी तेथील सरपंच, ग्रामसेवक व स्थानिक नागरिक यांनीही यात सहभाग घेतला होता. या मॉक ड्रिलमध्ये खूप कमी वेळात प्रशासनाने तयारी करुन सर्व विभागांनी आपाआपली जबाबदारी, नेमून दिलेले काम योग्य पद्धतीने पार पाडले. विधानभवन प्रांगण, पुणे महानगरपालिका प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय इमारत, वनाज औद्योगिक परिसर, मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव नगरपरिषद या शहरी व ग्रामीण भागात एकाच वेळी दुपारी चार वाजता मॉक ड्रिल घेण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये संरक्षण दल, नागरी संरक्षण दल, एनडीआरएफ, पोलीस, महसूल, आरोग्य, नगरपालिका, महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थान विभाग, रेड क्रॉस सोसायटी, तसेच संबंधित शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्टीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरु युवा केंद्राचे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. ही मॉक ड्रिल दक्षता म्हणून घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी सांगितले.
पुणे | प्रतिनिधी (विलास गुरव) : शालेय विद्यार्थिनींसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेचा लाभ आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनाही मिळावा, अशी ठाम मागणी आयटीआय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व भाजप युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे महामंत्री वैभव सोलणकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन दिले आहे.सध्या या योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना एसटी बसचा मोफत मासिक पास दिला जातो. ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेतच पास मिळण्याची सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम स्तुत्य असला तरी, त्यात आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना समाविष्ट करण्यात आलेले नाही, ही बाब खेदजनक असल्याचे सोलणकर यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, “आयटीआय हे तांत्रिक शिक्षणाचे केंद्र असून, अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थिनी रोज दूरवरून ये-जा करतात. त्यामुळे बस भाड्याचा मोठा बोजा पालकांवर येतो. जर बारावीपर्यंत सवलत दिली जात असेल, तर तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या आयटीआय विद्यार्थिनींनाही ही सुविधा दिली गेली पाहिजे.”या पार्श्वभूमीवर ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेचा विस्तार करून आयटीआय विद्यार्थिनींनाही मोफत बस पासची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी अधिकाधिक जोर धरू लागली आहे. वैभव सोलणकर यांनी लवकरच मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी देखील संपर्क करून या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे संकेत दिले आहेत.