Breaking news

ब्लिंकिट मुळे लोणावळ्यातील 200 तरुणांना मिळाला रोजगार; नागरिकांना घरपोच मिळते माफक दरात सेवा – नासिर शेख

लोणावळा : मुंबई व पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यावर असलेल्या लोणावळा या पर्यटन स्थळावर सध्या विविध ऑनलाइन कंपन्या आपल्या सेवा सुविधा पुरवत आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या विविध प्रकारच्या वस्तू विकत घेता येत आहेत. माफक दरामध्ये घरपोच सेवा मिळत असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी मध्ये अडकून पडण्याचा त्रास कमी होऊ लागला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी यामुळे मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच या कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार दिला जात असल्यामुळे लोणावळा शहरातील तरुणांना या सेवांच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष नासिर शेख यांनी दिली.

      नासिर शेख म्हणाले, किराणा माल व दैनंदिन वस्तूंची जलद सेवा देणारी कंपनी म्हणून ब्लिंकिट या कंपनीची ओळख आहे. लोणावळा शहरामध्ये ही कंपनी सुरू झाली आहे. या कंपनीत लोणावळा शहर व परिसरातील 387 कामगार काम करत आहेत. त्यापैकी दोनशे पेक्षा अधिक तरुण दैनंदिन सेवा देण्याचे काम करत आहे. ब्लिंकिट प्रमाणेच झोमॅटो मध्ये 90 तरुण, स्विगी मध्ये 30 तर इन्स्टा मार्ट मध्ये 20 स्थानिक तरुण काम करत आहेत. लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असल्याने येथे कोणत्याही प्रकारच्या औद्योगिक वसाहती नाहीत. पर्यटन व पर्यटकांना सुविधा देणे हेच येतील रोजगाराचे केंद्र आहे. ऑनलाइन सेवा सुविधा देणाऱ्या कंपन्यांमुळे या ठिकाणी येणारे पर्यटक तसेच स्थानिक भागातील नागरिकांना घरपोच उत्तम दर्जाच्या वस्तू मिळत असून त्या सेवा देण्याच्या माध्यमातून स्थानिकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. मासिक सरासरी 18 ते 20 हजार रुपये उत्पन्न या तरुणांना या सेवा प्रक्रियेमधून मिळत आहेत. चांगल्या प्रकारचे उत्पन्न तरुणांना या ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून मिळत असल्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी कामे करण्यासाठी इच्छुक आहेत अनेक जण हे आपला नोकरी व्यवसाय सांभाळून उर्वरित वेळेमध्ये सेवा देण्याचे काम करत आहेत त्या माध्यमातून महिन्याला आठ ते दहा हजार रुपये त्यांना उत्पन्न देखील मिळत आहे.

      लोणावळा शहरांमधील वाहतूक कोंडी व येथील महागाई ही सर्वश्रुत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊन खरेदी करण्यापेक्षा माफक दरामध्ये घरपोच ऑनलाईन पद्धतीने चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तर या सुविधेमुळे मोठा फायदा झाला आहे वाहतूक कोंडी मध्ये रस्त्यावर जाऊन किंवा बाजारपेठेमध्ये जाऊन धक्के खाण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीने घरपोच वस्तू मिळत आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना देखील चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या मुख्य केंद्रापासून नऊ किलोमीटरच्या परिसरामध्ये सदरचे सेवा दिली जात आहे. त्यामुळे लोणावळा शहराच्या गवळीवाडा या मध्यवर्ती भागामध्ये ब्लिंकिट यांनी आपले मध्यवर्ती कार्यालय सुरू केली असून त्या ठिकाणाहून सदरची सुविधा पुरवली जात आहे. काही व्यवसायिकांनी याला विरोध दर्शवला असला तरी बहुतांश लोणाकरांना या सुविधेमुळे चांगला लाभ मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी या सुविधेचे स्वागत देखील केले आहे. स्थानिकांना रोजगार व नागरिकांना माफक दरांमध्ये सुविधा देणाऱ्या कंपन्यांना विरोध करणे केवळ खोतेपणाचे होणार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने या सुविधा देणाऱ्या कंपन्यांना पाठिंबा दिला असल्याचे लोणावळा शहराध्यक्ष नासिर शेख यांनी सांगितले. यापूर्वी लोणावळा शहरांमध्ये सुरू झालेल्या वेलनेस मेडिकल स्टोर याला देखील सुरुवातीला विरोध झाला होता मात्र आज याच स्टोर मधून सर्वसामान्य नागरिकांना कमी किमतीत उत्तम दर्जाची औषधे देखील मिळत आहेत. सध्या युग हे स्पर्धेचे युग असल्याने विविध कंपन्या चांगल्या दर्जाच्या सुविधा ग्राहकांना देत आहेत व ग्राहक देखील त्याचे कौतुक करत आहे. असे असताना काही व्यावसायिक स्पर्धेत सहभागी न होता केवळ ओरड करत आहेत.

इतर बातम्या

आषाढी वारीचा उत्सव पद्मश्री डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयात उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा हरिनामात उत्स्फूर्त सहभाग, वारकरी वेशभूषा अन् पालखीने भारावले वातावरण

लोणावळ्यात केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांची व्यापारी संघाने घेतली भेट; ब्लिंकिट ऑनलाईन सर्व्हिस मुळे लोणावळ्यातील लहान व्यवसायिकांवर मोठा परिणाम होत असल्याची मांडली खंत