Lonavala News : भांगरवाडी साईबाबा मंदिरासमोरील काँक्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेने भांगरवाडी विभागातील साईबाबा मंदिरासमोरील रस्ता तब्बल बारा वर्षानंतर पावसाळ्यापुर्वी केला. मात्र तो देखील निकृष्ट दर्जाचा झाल्याने येथील रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो आहे. लोणावळा नगरपरिषदेने तात्काळ या रस्त्याचे दुरुस्ती करत नागरिकांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन या परिसरातील सर्व सोसायट्यांनी लोणावळा नगरपरिषदेला दिले आहे.
साईबाबा मंदिर ते खळदकर घरादरम्यान लोणावळा नगरपरिषदेने मागील जून महिन्यात रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी केले. मात्र लगेचच पाऊस सुरू झाल्याने सदरचा सिमेंटचा रस्ता खराब झाला. ही बाब नागरिकांनी लोणावळा नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पावसाळ्यानंतर नगरपरिषदेने त्या रस्त्यावर वर पुन्हा एक सिमेंटचा थर मारला. मात्र सिमेंट एकजीव न झाल्याने सदर रस्त्यावरील खडी निघू लागली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात क्रश सॅन्ड ची धूळ तयार होऊ लागल्याने त्याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. साधी दुचाकी गाडी गेली तरी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून धूळ उडत ती सोसायट्यांमधील घरांमध्ये जात असल्याने नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. तसेच बारिक खडीवरुन दुचाकी वाहने घसरुन पडत आहेत. याकरिता लोणावळा नगरपरिषदेने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करत चांगल्या दर्जाचा रस्ता बनवत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे. ज्युतिका को. ऑफ. हाऊसिंग सोसायटी, साईबाबा उत्सव मंडळ, श्री सिंधूचंद्र स्मृती सह. गृह मर्या., श्री गुरुदत्त अपार्टमेंट, तावरे सदन यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सह्याचे निवेदन नगरपरिषदेला दिले आहे.
महत्वाच्या बातम्या वाचा -
एक्सप्रेस वेवर भिषण अपघातात तिघांचा मृत्यू
त्या जखमी बाल शिव भक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू
वैष्णवी रसाळ सौभाग्यवती 2023 च्या मानकरी
आता आधारकार्ड करा आँनलाईन अपडेट ते देखील मोफत
कंटेनरच्या धडकेत वाकसई गावातील दुचाकी चालक व शाळकरी मुलगी जखमी