Breaking news

सौभाग्यवती 2023 । वैष्णवी रसाळ ठरल्या सौभाग्यवती 2023 तर संगिता मोहिते भाग्यवान महिला

लोणावळा : भाजपा महिला आघाडी मावळ तालुका व नाणे मावळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सौभाग्यवती 2023 या खेळ रंगला महिलाचा स्पर्धेत वेहेरगाव येथील वैष्णवी चंद्रकांत रसाळ ह्या सौभाग्यवती 2023 च्या मानकरी ठरल्या त्यांना सोन्याचे मंगळसूत्र, मानाची पैठणी व शिलाई मशिन भेट देण्यात आली. तर नेसावे गावच्या संगिता मोहिते या स्पर्धेतील भाग्यवान महिला ठरल्या. त्यांना लकी ड्राॅ चे प्रथम क्रमांकाचे दुचाकी हे बक्षिस देण्यात आले. सुमारे 4 ते 5 हजार महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्याम सुप्रसिद्ध निवेदक व अभिनेते संदीप पाटील यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण करत महिलाचे विविध खेळ घेतले. सहा तास हा कार्यक्रम सुरु होता.

     खेळ रंगला पैठणीचा या खेळात वैष्णवी चंद्रकांत रसाळ (प्रथम - सोन्याचे मंगळसूत्र), गंगूबाई चिंधू मराठे (द्वितीय - सोन्याची नथणी), सुचिता अनिल दाभणे (तृतीय - चांदीचे पैंजन), अर्चना नवनाथ पडवळ (चतुर्थ - चांदीचा छल्ला) व रेखा दत्तात्रय वारुडे (पाचवा - चांदीची जोडवी) क्रमांक मिळविला. त्यांना सर्वांना अनुक्रमे मानाची पैठणी व शिलाई मशिन देण्यात आली.

    लकी ड्राॅ - संगिता मोहिते ( प्रथम - दुचाकी), कविता शंकर दळवी (द्वितीय - 32 इंची एलईडी टिव्ही), उषा मधूकर पडवळ (तृतीय - फ्रिज), सिता विष्णू शिळवणे (चतुर्थ - पिठाची गिरणी) याव्यतिरिक्त काढण्यात आलेल्या दहा लकी ड्राॅ विजेत्यांना शिलाई मशिन देऊन गौरविण्यात आले. यामध्ये रेऊबाई शिवराम येवले, सुदेशना सुरेश पिंपळे, जयश्री केशव कांबळी, सुजाता नवनाथ मानकर, कल्पना किशन गायकवाड, संगिता सुरेश कडू, सारिका संतोष ब‍ांगर, संगिता मच्छिंद्र विखार, सुषमा गणेश पवार, रेश्मा राम मोरे यांचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच मावळ भाजपा महिला आघाडीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांना स्व. सुषमा स्वराज पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य मानविका तांबे व किर्तनकार हभप जयश्री येवले यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

     कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, दूध संघाचे डायरेक्टर बाळासाहेब नेवाळे, भाजपा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारिकाताई संजय भेगडे, माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, मा. जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ गुंड, मिलिंद बोत्रे, प्रशांतअण्णा ढोरे, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, बाळासाहेब घोटकुले, वडगावच्या नगरसेविका अर्चना म्हाळसकर, सारिका भिलारे, दिपाली मोरे, वडगाव महिला शहराध्यक्ष धनश्री भोंडवे, लोणावळा शहर अध्यक्ष योगिता कोकरे, माजी नगरसेविका निलिमा दाभाडे, सरचिटणीस रजनी ठाकूर, नगरसेविका शोभा भेगडे, मा. उपसभापती दिपाली म्हाळसकर, राणी म्हाळसकर, वैशाली म्हाळसकर तसेच नगरसेवक नगरसेविका विविध गावचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच, उपसरपंच विविध क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन महिला आघाडीच्या कार्यध्यक्षा सुमित्राताई जाधव, कल्याणी ठाकर, सिमा आहेर, वैशाली ढोरे, ज्योती काटकर, अंजली कडु, ग्रामपंचायत सदस्य पुजा पडवळ, योगीता पडवळ, मंदा टाकळकर, चंदा पिंगळे, अश्विनी तिकोणे, रोहिणी गाडे, आशा जाधव, शैला मुर्‍हे, सुजाता मुर्‍हे, सरपंच अश्विनीताई गुंड, अनिता कडु, प्रगती वरे, निलम सुतार, सुरेखा उंबरे, वैदेही रणदिवे, सारिका शिदें, सारिका घोलप, सुप्रिया शेलार, अनिता सावले, शिल्पा दळवी, सुजाता शेलार, निलम केदारी, सुप्रिया पडवळ तसेच वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले, कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी, नाणे मावळ सर्व पदाधिकारी यांनी केले.

यावेळी बोलताना सायली बोत्रे म्हणाल्या, जागतिक महिला दिनाच्या निमित्त ग्रामीण भागातील महिलांसाठी मनोरंजनासोबत सामाजिक भान ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मालविका तांबे म्हणाल्या, महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी तर पुरान काळापासून स्त्रीयांनी कतृत्व सिद्ध केले असल्याचे हभप जयश्री येवले यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

जखमी शिवभक्तांना 1 लाखाची मदत

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवज्योत घेऊन येणार्‍या शिलाटणे गावातील 34 शिवभक्तांचा कंटेनरच्या धडकेत अपघात झाला आहे. या जखमी शिवभक्तांना मदत म्हणून भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे यांनी 1 लाख रुपयांची मदत जाहिर केली.

इतर बातम्या