Breaking news

Expressway Accident Breaking : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भिषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळी आढे गावाच्या हद्दीत किलोमीटर 82 जवळ कारचा भिषण अपघात झाला. समोर जाणार्‍या मालवाहू ट्रकला कारने मागून जोरात धडक दिल्याने झालेल्या या अपघातात कारमधील तीघांचा मृत्यू झाला आहे. अतिशय भिषण असा हा अपघात आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार क्र. (MH 04 JM 5349) ही किमी 82 जवळ समोर जाणारा ट्रक क्र. (RJ 09 JB 3638) ला मागून जोरात धडकली. यामध्ये जवळपास अर्धी कार ट्रकच्या मागील बाजुने ट्रकखाली गेली. चालकासह दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा व महामार्ग पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने वाहने बाजुला करत कार मधील सर्वांना बाहेर काढले.

महत्वाच्या बातम्या वाचा -

त्या जखमी बाल शिव भक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू 

वैष्णवी रसाळ सौभाग्यवती 2023 च्या मानकरी

आता आधारकार्ड करा आँनलाईन अपडेट ते देखील मोफत

कंटेनरच्या धडकेत वाकसई गावातील दुचाकी चालक व शाळकरी मुलगी जखमी

इतर बातम्या