Breaking news

मोठी बातमी । भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचा निर्णय; आधार कागदपत्रांचे विनामूल्य ऑनलाईन अद्ययावतीकरण

पुणे (अमिन खान) : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना त्यांच्या आधार ओळखपत्रामधील कागदपत्रांचे मोफत अद्ययावतीकरण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या लोक-केंद्रित निर्णयाचा लाखो नागरिकांना लाभ मिळणार असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून, हा निर्णय घेतला असून, नागरिकांनी माय आधार (myAadhaar) पोर्टलवर त्यांचे दस्तावेज अद्ययावत करण्यासाठी या मोफत सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 

ही मोफत सेवा 15 मार्च ते 14 जून 2023 या कालावधीसाठी उपलब्ध आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, की ही सेवा केवळ myAadhaar या पोर्टलवर विनामूल्य आहे, मात्र प्रत्यक्ष आधार केंद्रांवर पूर्वी प्रमाणे 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

     भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, नागरिकांना ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा (PoI/PoA) असलेले दस्तऐवज, विशेषत: आधार 10 वर्षांपूर्वी जारी केले असेल आणि त्याचे कधीच अद्ययावतीकरण केले नसेल, तर संबंधित दस्त ऐवाजांच्या लोकसंख्या शास्त्रीय तपशीलांचे पुनर्र-प्रमाणीकरण करण्यासाठी, अपलोड करायला प्रोत्साहन देत आहे. लोकसंख्या शास्त्रीय तपशील (नाव, जन्मतारीख, पत्ता इ.) बदलण्याची गरज असेल, तर नागरिक नियमित ऑनलाइन अपडेट (अद्ययावतीकरण) सेवा वापरू शकतात किंवा जवळच्या आधार केंद्राला भेट देऊ शकतात. नागरिक त्यांचा आधार क्रमांक वापरून https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करू शकतात. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल, संबंधित नागरिकाला केवळ 'दस्तऐवज अपडेट' वर क्लिक करावे लागेल, आणि त्याचे विद्यमान तपशील प्रदर्शित केले जातील.

इतर बातम्या