Lonavala News l भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे लोणावळ्यात काँग्रेस कडून पेढे वाटत स्वागत

लोणावळा : भारताने पाकिस्तानवर मंगळवारी रात्री केलेल्या हल्ल्याचे काँग्रेस पक्षाकडून लोणावळ्यात पेढे वाटत स्वागत करण्यात आले. देशाच्या संरक्षणासाठी सरकार जी पावले उचलेल काँग्रेस त्यांच्यासोबत असेल असे एवढे सांगण्यात आले. देशांतर्गत राजकीय पक्ष म्हणून मतमातांतरी असली तरी देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपण सर्वजण एक आहोत आज संदेश यामधून देण्यात आला असल्याचे माजी नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव भांगरे, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, अब्बास भाई शेख, मंगेश बालगुडे, सुनील मोगरे, अय्याज शिकीलकर, फिरोज बागवान, योगेश गवळी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारत जिंदाबाद व पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.