Breaking news

Accident News : वरसोली जवळ कंटेनरच्या धडकेत दुचाकी चालक व शाळकरी मुलगी गंभिर जखमी

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरसोली गावाच्या हद्दीत आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कंटेनर ने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये दुचाकी चालक व एक शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

     वाकसई गावांमधील संतोष येवले हे आपल्या मुलीला शाळेमध्ये सोडण्यासाठी दुचाकी गाडीवरून जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनर ने त्यांच्या दुचाकी गाडीला धडक दिली. यामध्ये कंटेनर चे चाक पायावरून गेल्याने संतोष येवले यांच्या दोन्ही पायाला व शरीरावर गंभीर जखमा झाले आहेत. तसेच दुचाकी गाडीवर मागे बसलेली त्यांची मुलगी हिलादेखील गंभीर मार लागला आहे. संतोष यांच्या डोक्यात हेलमेट असल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सदर कंटेनर ताब्यात घेतला असून जखमी संतोष व त्यांच्या मुलीवर तळेगाव येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. सदर अपघाताला जबाबदार असणाऱ्या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या अपघातानंतर नागरिकांनी केली आहे.

इतर बातम्या