Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Maval Loksabha Election | लोणावळा रेल्वे विभागात महायुतीच्या वतीने प्रचार पत्रकांचे वाटप

लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( A), रासप, मनसे, एसआरपी घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील महायुतीच्या वतीने प्र�

संजोग वाघेरे यांची मशाल घराघरात पोहचवण्यासाठी लोणावळा महाविकास आघाडीने कसली कंबर; प्रचाराला जोरदार प्रतिसाद

लोणावळा : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी लोणावळा शहरात महाविकास आघाडीच्या तिन्ही घ

क्राईम न्युज

अतिक्रमणाची बातमी लावली म्हणून कामशेत मध्ये पत्रकारांना शिवीगाळ; पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

कामशेत : कामशेत येथे मुंबई पुणे महामार्ग लगत असलेल्या अतिक्रमणाबाबत छायाचित्रासह वृत्तपत्रांमध्ये बातमी दिल्याचा राग मनामध्ये धरत पत्रकारांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार कामशेत येथे घडला आहे याबाबत पत्रकारांनी कामशेत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.     चेतन मोहन वाघमारे (व्यवसाय पत्रकार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिराज शेख रा.कामशेत (वय 35), सिराज शेखची आई व भाऊ (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       कामशेत भागातील पत्रकारांनी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गा लगत अतिक्रमण झाले असल्याच्या बातम्या छायाचित्रांसह मागील पंधरा दिवसात विविध पेपर मध्ये प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामध्ये आमच्या दुकानाचा फोटो का टाकला असे म्हणत तुम्हाला मस्ती आली आहे का?, तुम्ही अतिक्रमणाची बातमी कशी लावली? असे म्हणत शिवीगाळ करत तुम्हाला बघून घेतो अशा प्रकारची दमदाटी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाच्या ठळक बातम्या देखील वाचामावळ लोकसभेसाठी तब्बल 38 उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्जमावळ लोकसभेसाठी आता लोणावळ्यातून देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; भांगरवाडीतून उमेदवारी अर्ज दाखलमहाविकास आघाडीच्या वतीने लोणावळ्यात संजोग वाघेरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मशाल घराघरात पोहचवण्याचा केला संकल्पपोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे जागतिक हिवताप दिन साजरानागरिकांना जाहीर आवाहन | लोणावळ्यात सम व विषम तारखेप्रमाणे वाहन पार्किंग करा; अन्यथा पोलीस करणार कारवा

मावळ

Breaking News | मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आढे गावाजवळ खाजगी प्रवासी बस जळून खाक

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मावळ तालुक्यातील आढे गावाजवळ (किमी 78) पुणे मार्गिकेवर एका खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अचानक पेट घेऊन लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाली. या बस मध्ये 36 प्रवासी होते. प्रसंगवधान राखत सर्व प्रवासी व चालक हे बसमधून बाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.    मिळालेल्या माहितीनुसार बस पुण्याच्या दिशेने जात असताना टायर फुटला व त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्याने बसला आग लागली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवण्यात आली आहे. एक्सप्रेस वे च्या वरून गावांना जोडणाऱ्या पुलाखालीच ही घटना घडल्याने पुलावर काही काळ धुराचा लोट उसळला होता.

पिंपरी चिंचवड

Maval Loksabha Election | रडीचा डाव फसला; छाननी मध्ये नाशिकचे संजय वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज झाला बाद

मावळ माझा न्युज नेटवर्क : निवडणूक लढवताना विरोधी प्रतिस्पर्ध्याची मते कशी विभागली जातील याकरिता अनेक डावपेच खेळले जातात. असाच एक डावपेच मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना खेळण्यात आला होता. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाशी साधर्म असलेल्या नाशिक येथील संजय सुभाष वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आला होता. नावाशी साधर्म्य असल्याने हे संजय सुभाष वाघेरे कोण? याबाबत मागील दोन दिवस चर्चांना उधाण आले होते. तसेच नाशिक येथील व्यक्ती मावळ लोकसभेसाठी अर्ज भरण्यासाठी कशी आली व त्यांना येथे कोणी आणले याबाबत चर्चा सुरू असताना आज मात्र नामनिर्देशन पत्रांची छाननी करताना काही कागदपत्रांची कमी असल्याने संजय वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरविला आहे. यामुळे मत विभागणीसाठी खेळण्यात आलेला रडीचा डाव फसला असल्याची चर्चा आज मतदारसंघात रंगली आहे. 2014 साली याच मतदारसंघांमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या अन्य एका लक्ष्मण जगताप यांनी असाच उमेदवारी अर्ज भरला होता. 2024 च्या निवडणुकीमध्ये संजोग वाघेरे पाटील व संजय वाघेरे अशा नाव साधर्म्य असलेल्या दोन नावांमुळे दहा वर्षानंतर पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. याविषयी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले, समोर पराभव दिसू लागला की असे रडीचे डाव खेळले जातात. यामागे कोण आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता नाही, डाव रडीचा असल्याने तो सुरू होण्यापूर्वीच मोडून पडला आहे. माझी निवडणूक ही आता माझी राहिली नसून ती जनतेने हाती घेतलेले निवडणूक आहे. त्यामुळे कोणी कितीही डावपेच खेळले तरी मतदार राजा आता भुलणार नाही कारण मतदार संघात लोकांनां विकास करणारा त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणार, त्यांचे दुःख व समस्या जाणून घेणारा खासदार हवा आहे असे सांगितले.      मावळ लोकसभेसाठी 38 जणांनी नाम निर्देशन अर्ज काल अखेर दाखल केले होते आज या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये तीन अर्ज हे बाद करण्यात आले आहेत कागदपत्रांची अपूर्णता, प्रतिज्ञापत्र न जोडणे व डिपॉझिट भरण्यात झालेला विलंब या कारणांमुळे हे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

Video News

अन्य बातम्या

राष्ट्रीय सेवक संघ लिखित तीर्थकर भगवान महावीर या मासिक विशेषांकाचे लोकार्पण

मावळ माझा न्युज नेटवर्क : राष्ट्रीय सेवक संघ यांच्या वतीने जैन धर्मीयांच्या तिर्थकर भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या तीर्थकर भगवान महावीर या हिंदी मासिक विवेक विशेषांकाचे लोकार्पण मंगळवारी (23 एप्रिल) घाटकोपर येथील पारसधाम मध्ये राष्ट्रसंत नम्रमुनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.       पद्मश्री रमेश पतंगे अध्यक्ष हिंदुस्तान प्रकाशन संस्था यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमास भाजपा उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल, राष्ट्रीय सेवक संघाचे हिंदी विवेक याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर, समस्त महाजन संस्था यांचे ट्रस्टी परेशभाई शहा, आमदार पराग भाई शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सदर प्रकाशनाच्या वेळी हजाराच्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते.      यावेळी बोलताना राष्ट्रसंत नम्रमुनी यांनी सांगितले की, राष्ट्रीय सेवक संघ यांनी भगवान महावीर बाबत केलेला अभ्यास व हिंदू समाजातील प्रत्येक जातीतील धर्मांना एकत्र करण्याचा केलेला प्रयत्न हे त्यांचे कार्य मोठे आहे. हिंदू धर्म विविध जाती धर्मामध्ये विखुरलेला असून त्यांना एक करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवक संघ करत आहे. सर्व हिंदू धर्म एक झाल्यास संपूर्ण जगामध्ये अहिंसा व सत्य याच्या प्रसार होईल. संपूर्ण विश्वामध्ये शांती लाभेल असे सांगितले. सर्व प्रमुख पाहुण्याच्या सत्कार  राष्ट्रसंत नम्रमुनी यांच्या हस्ते करण्यात आला.

Mavalmaza android application

Coming soon..