Breaking news

नागरिकांना जाहीर आवाहन | लोणावळ्यात सम व विषम तारखेप्रमाणे वाहन पार्किंग करा; अन्यथा पोलीस करणार कारवाई

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरीकांना तसेच लोणावळा शहरात येणाऱ्या नागरिकांना यापुढे लोणावळ्यात वाहने उभी करताना ती सम विषम तारखे प्रमाणे उभी करावी लागणार आहेत. लोणावळा नगरपरिषदेने रस्त्याच्या कडेला ज्या ठिकाणी सम व विषम तारखेचे वाहन पार्किंगसाठीचे सूचना फलक लावले आहेत. त्या सूचना फलकानुसारच नागरीकांनी वाहने पार्क करणे आवश्यक आहे. जे नागरीक सम व विषम तारखेच्या सूचना फलकानुसार आपली वाहने पार्क करणार नाहीत अशा नागरीकांवर लोणावळा शहर पोलिस स्टेशन कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यामुळे नागरीकांनी स्वतःचे वाहन पार्क करताना सम व विषम तारखेच्या सूचना फलकांनुसार वाहने पार्क करावीत असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी केले आहे.

      तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या मॅकडोनल्डस समोरील जागा ही वाहन पार्किंगसाठी नसल्याने त्याठिकाणी तसा फलक देखील लावण्यात आला आहे. असे असताना देखील अनेक वाहन चालक येथे रस्त्यावर वाहने उभी करतात. यापुढे त्या ठिकाणी कोणतेही वाहन पार्क केल्याचे आढळून आल्यास सदर वाहन धारकांवर लोणावळा शहर पोलिस स्टेशन कायदेशीर कारवाई करणार आहे. वरील सूचनांचे पालन न केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईची सर्वस्वी जबाबदारी संबधित वाहनधारक यांची राहील याची सर्व नागरीकांची नोंद घ्यावी असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या