Breaking news

Expressway Burning Bus | मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खाजगी प्रवासी बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर रात्री 2.20 वाजण्याच्या सुमारास खोपोली बाह्य वळणा जवळ एका खाजगी प्रवासी बसला घाट चढत असताना अचानक आग लागल्याने बस पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. सुदैवाने या बस मधील सर्व प्रवासी खाली उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक (MH 01 CR 8585) ही पुण्याच्या दिशेने येत असताना खंडाळा घाटातील खोपोली बाह्य वळण येथे बसला अचानक आज लागली. आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील सर्व प्रवासी  सुखरूप व्यवस्थित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणीही व्यक्ती जखमी झालेली नाही. अपघाताची माहिती समजताच फायर ब्रिगेडची वाहने घटनास्थळी दाखल झाली. तसेच देवदूत, आय आर बी पेट्रोलिंग, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस स्टेशनची टीम, अपघातची टीम, डेल्टा फोर्स यांनी घटनास्थळावर जात आग विझविण्याचा प्रयत्न. केला. साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आल्यानंतर पुणे मार्गिकेवरील दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे मध्यरात्री काही काळ एक्सप्रेस वे वरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

इतर बातम्या