Breaking news

अतिक्रमणाची बातमी लावली म्हणून कामशेत मध्ये पत्रकारांना शिवीगाळ; पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

कामशेत : कामशेत येथे मुंबई पुणे महामार्ग लगत असलेल्या अतिक्रमणाबाबत छायाचित्रासह वृत्तपत्रांमध्ये बातमी दिल्याचा राग मनामध्ये धरत पत्रकारांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार कामशेत येथे घडला आहे याबाबत पत्रकारांनी कामशेत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

     चेतन मोहन वाघमारे (व्यवसाय पत्रकार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिराज शेख रा.कामशेत (वय 35), सिराज शेखची आई व भाऊ (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       कामशेत भागातील पत्रकारांनी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गा लगत अतिक्रमण झाले असल्याच्या बातम्या छायाचित्रांसह मागील पंधरा दिवसात विविध पेपर मध्ये प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामध्ये आमच्या दुकानाचा फोटो का टाकला असे म्हणत तुम्हाला मस्ती आली आहे का?, तुम्ही अतिक्रमणाची बातमी कशी लावली? असे म्हणत शिवीगाळ करत तुम्हाला बघून घेतो अशा प्रकारची दमदाटी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्वाच्या ठळक बातम्या देखील वाचा

मावळ लोकसभेसाठी तब्बल 38 उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज

मावळ लोकसभेसाठी आता लोणावळ्यातून देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; भांगरवाडीतून उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या वतीने लोणावळ्यात संजोग वाघेरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मशाल घराघरात पोहचवण्याचा केला संकल्प

पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे जागतिक हिवताप दिन साजरा

नागरिकांना जाहीर आवाहन | लोणावळ्यात सम व विषम तारखेप्रमाणे वाहन पार्किंग करा; अन्यथा पोलीस करणार कारवा

इतर बातम्या