Breaking news

Maval Loksabha Election | लोणावळा रेल्वे विभागात महायुतीच्या वतीने प्रचार पत्रकांचे वाटप

लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( A), रासप, मनसे, एसआरपी घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील महायुतीच्या वतीने प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा सुरू आहे. शुक्रवारी लोणावळा शहरातील रेल्वे विभागात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार पत्रकाचे वाटप केले. रेल्वे विभागातील श्री बापदेव मंदिरात श्रीफळ वाढवून या भागात संवाद दौरा केला.

      रेल्वे विभागातील जिजामातानगर, डेनकर कॉलनी, स्वराज्यनगर, कालेकर मळा, राव कॉलनी, बारा बंगला, मरीमाता चाळ, आगवाला चाळ आदी ठिकाणी घरोघरी लोणावळा शहरातील महायुतीचे पदाधिकारी यांनी कार्यअहवाल व पत्रकाचे वाटप केले.

इतर बातम्या