Breaking news

संजोग वाघेरे यांची मशाल घराघरात पोहचवण्यासाठी लोणावळा महाविकास आघाडीने कसली कंबर; प्रचाराला जोरदार प्रतिसाद

लोणावळा : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी लोणावळा शहरात महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी कंबर कसली असून त्यांच्या प्रचाराला सुरुवात केल्यापासून तिन्ही दिवस इंदिरानगर, तुंगार्ली व नांगरगाव भागात त्यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद लाभला आहे. 

     गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवत वाघेरे यांच्या प्रचाराला गुरुवारी सुरुवात झाली. इंदिरानगर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला संघटक शादान चौधरी यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात प्रचाराला जोरदार प्रतिसाद लाभला. दुसऱ्या दिवशी तुंगार्ली येथे देखील महाविकास आघाडीच्या वतीने प्रचार करण्यात आला. याठिकाणी महाविकास आघाडीसह सर्वसामान्य नागरिक व मतदार देखील यामध्ये सहभागी झाले होते. नांगरगाव गावठाण भागात शिवसेना ठाकरे गटाचे चांगले प्राबल्य असल्याने याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक प्रचारात सहभागी झाले होते. दोन दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी संजोग वाघेरे यांची निवडणूक मतदारांनी हाती घेतली असून तेच तुम्हाला विजया पर्यंत घेऊन जातील हे केलेले भाकीत प्रचारा दरम्यान खरे होताना दिसत आहे.

     महाविकास आघाडीच्या या घर भेट दौऱ्यात नागरीकांच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेऊन परीचय पत्रकाचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी लोकांकडून अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला जात असल्याचे महा विकास आघाडीचे निखिल कवीश्वर, बाळासाहेब फाटक, नासीर शेख, प्रमोद गायकवाड यांनी सांगितले. या घर भेट दौऱ्यात महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडी, युवक आघाडी, सेवादलच्या महिला पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व आजी माझी कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

इतर बातम्या