Breaking news

Maval Loksabha Election | महायुतीचा आज लोणावळ्यात मेळावा

लोणावळा : मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज लोणावळ्यात मेळावा होणार आहे. मेट्रोपोल हॉटेल येथे सायंकाळी 5.30 वाजता हा मेळावा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर यांनी दिली.

    दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी कार्ला परिसर व लोणावळा भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच हनुमान जयंती निमित्त लोणावळा आणि खंडाळा येथील विविध मंडळांना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. 

     यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपा मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड, राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, शहराध्यक्ष अरूण लाड, गुलाबकाका म्हाळसकर, शरद हुलावळे, श्रीधर पुजारी, जीवन गायकवाड, संजय भोईर, ब्रिंदा गणत्रा, अंकुश देशमुख, जितेंद्र बोत्रे, आशिष बुटाला, नवनाथ हारपुडे आदी उपस्थित होते.


इतर बातम्या