Breaking news

Maval Loksabha Election | महाविकास आघाडीच्या वतीने लोणावळ्यात संजोग वाघेरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मशाल घराघरात पोहचवण्याचा केला संकल्प

लोणावळा : महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (23 एप्रिल) रोजी मावळ लोकसभेसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आज बुधवारी (24 एप्रिल) रोजी गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरात महाविकास आघाडीकडून प्रभू श्रीराम, विघ्नहर्ता गणपती बाप्पा, दत्तगुरु व मारुतीराया यांचे दर्शन घेऊन, परीचय पत्रकाचे पुजन करून काँग्रेसचे जेष्ठ नेते माऊली दाभाडे यांच्या शुभहस्ते नारळ वाढवत महा विकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

      यावेळी कॉग्रेस आयचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, शिवसेना महिला आघाडी सहसंपर्क संघटिकी पुणे जिल्हा शादानभाभी चौधरी, कॉग्रेस शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष लोणावळा शहर अध्यक्ष पप्पूभाई नासिर शेख, मा.नगराध्यक्ष राजूभाऊ गवळी, शिवसेना मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूती खोले, मा.उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिर्के, शिवसेना शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष शहर प्रवक्ते फिरोज शेख, राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा श्वेताताई वर्तक, कॉग्रेस महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा पुष्पाताई भोकसे व  महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

       यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मावळ लोकसभेत बदल करण्याचा निर्धार व्यक्त करत संजोग वाघेरे यांचे निवडणूक चिन्ह असलेली मशाल हाताच्या वज्र मुठीत धरून घराघरात पोहचवत विजयाची तुतारी वाजवण्याचा संकल्प केला. गवळीवाडा येथून संजोग वाघेरे व मशाल चिन्ह याच्या घोषणा देत पदयात्रा इंदिरानगर भागात जात घरोघरी जाऊन निवडणूक प्रचार पत्रकांचे वाटप मतदारांना केले. मावळच्या खासदारांनी दहा वर्षात लोणावळा शहरात कोणता मोठा निधी दिला, काय विकास कामे, कोविड काळात बंद झालेली पुणे लोणावळा लोकल देखील ते केंद्रात असताना पूर्वपदावर आणू शकले नाही की एक्सप्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत करू शकले नाहीत असा हल्लाबोल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रचारा दरम्यान केला.

इतर बातम्या