Breaking news

पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे जागतिक हिवताप दिन साजरा

लोणावळा : पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा या ठिकाणी आज जागतिक एक हिवताप दिन साजरा करण्यात आला. जिल्हा हिवताप अधिकारी, पुणे डॉ. अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या जागतिक हिवताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

      पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथील महिला पोलीस प्रशिक्षणार्थींना कीटकजन्य आजार (मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या) व जलजन्य आजार (कावीळ, टायफॉईड, गॅस्ट्रो) तसेच उष्माघाताची लक्षणे व काळजी, अनेमिया मुक्त भारत, पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता व व्यक्तिमित्व विकास या बद्दल प्रमुख उपस्थिती असलेल्या मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एम. एम. माकनदार, उपप्राचार्य श्रीमती प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक सलगर व सर्व प्रशिक्षक स्टाफ, मावळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिलीप ठोंबरे, लोणावळा आरोग्य केंद्राचे श्वेता कांबळे, गणेश तिकोणे, प्रसाद बिराजदार आदी उपस्थित होते.

इतर बातम्या