Big News : कार्ला परिसरातील या गावांमध्ये 3 दिवस दारु विक्रीला बंदी (DRY DAY)

लोणावळा : आई एकविरा देवीची यात्रा व पालखी सोहळ्यानिमित्त वेहेरगाव, कार्ला, मळवली, वरसोली, वाकसई या गावातील सर्व प्रकारच्या मद्य विक्रीला 27 ते 29 मार्च दरम्यान तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी हा बंदी आदेश लागू केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी मावळ माझा न्युजचा WHATS APP ग्रुप जाॅईन करा
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे. 27 ते 29 मार्च दरम्यान देवीची पालखी मिरवणूक व महत्वाचे विधी होणार असल्याने या काळात यात्रेसाठी राज्यातून सुमारे 5 ते 6 लाख भाविक येण्याची शक्यता असल्याने त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सदरचा मद्य विक्री बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तरी सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, 1949 व त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हंटले आहे.
महत्वाच्या इतर बातम्या वाचा -
लोणावळ्यात शालेय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला; तीन जण ताब्यात
भाजपाच्या विरोधात लोणावळ्यात काँग्रेसचे आंदोलन
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त 14 सिद्ध पादुकांचे दर्शन
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी घेतला कार्ला गडावरील यात्रा बंदोबस्ताचा आढावा