Breaking news

Lonavala Crime News : लोणावळ्यात शालेय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला; 3 अल्पवयीन मुले ताब्यात

लोणावळा : गवळीवाडा येथील एका खाजगी शाळेत शिकणार्‍या शालेय विद्यार्थ्यांवर तीन अन्य अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्र व फायटर च्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत सदर शालेय विद्यार्थी गंभिर जखमी झाला असून याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी मावळ माझा न्युजचा WHATS APP ग्रुप जाॅईन करा 

     अकिब अमिर शेख (वय 16, रा. गणपती चौक कामशेत) असे या हल्ल्यात गंभिर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याने स्वतःच या घटनेची फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरगाव भागात राहणारी दोन 15 वर्षाची मुले व आगवाला चाळ येथे राहणारा एक 16 वर्षाचा मुलगा या तीघांनी शुक्रवारी (24 मार्च) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अकिब शेखवर जीवघेणा हल्ला करत त्याला जखमी केले. गवळीवाडा येथील व्हिपीएस शाळेच्या जवळील रस्त्यावर वरील तीघांनी शेख याला पकडत त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला व फायटरने डोक्यात मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या मारहाणीतून शेख हा वाचला आहे. वरील तीघांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ते तीघेही अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी मावळ माझा न्युजचा WHATS APP ग्रुप जाॅईन करा 

     लोणावळ्यात यापूर्वी देखील याच भागात शालेय मुलांच्या भांडणाचा प्रकार सोशल मिडियावर व्हायरल झाला होता तर कुरवंडे रोडवर एका शालेय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. शालेय जीवनात मुले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. ही बाब चिंताजनक असून असे प्रकार रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या वाचा -

भाजपाच्या विरोधात लोणावळ्यात काँग्रेसचे आंदोलन

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त 14 सिद्ध पादुकांचे दर्शन

मंगलताई शेलार य‍ांचे निधन

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी घेतला कार्ला गडावरील यात्रा बंदोबस्ताचा आढावा

इतर बातम्या