Breaking news

Rahul Gandhi : लोणावळ्यात काँग्रेसचे भाजपा सरकारच्या विरोधात आंदोलन

लोणावळा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात षडयंत्र रचत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात आज लोणावळा शहरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत भाजपाचा व मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

    2019 साली कर्नाटक विधानसभा निवडणुकी दरम्यान राहुल गांधी यांनी मोदी आडनावा बाबत एक विधान केले होते. ज्याचा निकाल देताना सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. भारत जोडो अभियान राबवत काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभर फिरत आहेत. त्यांना सर्व ठिकाणी मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असून विरोधकांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र भाजपा व केंद्रातील मोदी सरकार करत असल्याचा आरोप या आंदोलनात काँग्रेस नेत्यांनी केला. 

      काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ माजी अध्यक्ष दिलीप ढमाले संभाजी राक्षे लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड माजी नगरसेवक सुधिर शिर्के, महिला शहराध्यक्षा पुष्पा भोकसे, रोहिदास वाळुंज, राजु गवळी, मंगेश बालगुडे, महंमद मणिय्यार, सर्फराज शेख, भरत खंडेलवाल, पप्पू लोखंडे, निखिल तिकोणे, आकाश परदेशी आदीसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या