Breaking news

श्री एकविरा देवी यात्रा । पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी घेतला कार्ला गडावरील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा

लोणावळा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी आई एकविरा देवीची चैत्री यात्रा 27 व 28 मार्च रोजी कार्ला गडावर होणार आहे. यात्रेकरिता व देवीच्या मुख्य पालखी मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता याठिकाणची सुरक्षा व्यवस्था व उपाययोजना याची पाहणी करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. अंकित गोयल यांनी कार्ला गड व पार्किंग परिसराची तसेच पायरी मार्गाची व मंदिर परिसराची पाहणी केली.

    यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोसई भोसले, पोलीस हवा नितेश कवडे, विजय मुंडे, पोलीस नाईक गणेश होळकर, प्रणय उकिर्डे, भूषण कदम तसेच वनविभागाचे वनपाल प्रमोद रासकर, गणेश धूळशेट्टे, पोलीस पाटील अनिल पडवळ, मंदिराचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड आदी उपस्थित होते. संपूर्ण यात्रेतील पार्किंग, पायथा मंदिर, पाच पायरी मंदिर, मुख्य मंदिर, गडावरील पायऱ्या, पालखी मिरवणूक मार्ग इत्यादी सर्व ठिकाणी स्थळ पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सूचना दिल्या आहेत.

इतर बातम्या