Breaking news

भांगरवाडी प्रभागात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्य अहवालाचे वाटप

लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, मनसे, एसआरपी या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहर महायुतीच्या वतीने आज भांगरवाडी प्रभागात उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्य अहवालाचे वाटप करण्यात आले.

      महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरांमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या वतीने प्रचार दौरे प्रभाग निहाय सुरू आहे. काल भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यानंतर आज भांगरवाडी प्रभागांमध्ये सायंकाळी पाच नंतर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्री गणपती मंदिर व श्रीराम मंदिर या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढवत कार्य अहवालाचे वाटप केले. मागील दहा वर्षापासून खासदार श्रीरंग बारणे हे मावळचे प्रतिनिधित्व करत असून यावेळी ते तिसऱ्यांदा मावळ लोकसभेतून निवडणूक लढवत आहेत. त्यांची ही हॅट्रिकची संधी असल्याने कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये जोर धरला आहे. महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात घेतलेल्या निर्णयांची माहिती यावेळी मतदारांना देण्यात आली.

इतर बातम्या