Breaking news

LONAVALA | लोणावळ्यात सलग आठव्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचाराचा जोर कायम

लोणावळा : मावळ लोकसभेचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, आम आदमी पार्टी या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचा जोर शुक्रवारी सलग आठव्या दिवशी देखील कायम होता.

       या विषयी बोलताना शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष नासिर शेख म्हणाले, मागील आठ दिवस आम्ही लोणावळा शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा प्रचार दौरा करत आहे. दर दिवशी मतदारांचा वाढत असलेला प्रतिसाद हा आमचा देखील उत्साह वाढवत आहे. मागील दहा वर्षांमध्ये लोणावळा शहरात खासदारांनी कोणतीही ठोस विकास कामे न केल्याने व मतदारांकडे पाठ फिरवल्याने मतदारांच्या मनामध्ये एक प्रचंड संताप व रोष निर्माण झाला आहे. तो रोष येत्या 13 मे रोजी मतदानातून मतदार दाखवून देतीलच मात्र प्रचारादरम्यान मिळत असलेला प्रतिसाद हा आमच्यासाठी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारा व आमचा उत्साह वाढवणारा आहे.

       लोणावळा शहरातील ठोंबरेवाडी येथे हनुमान मंदिरा मध्ये पुष्पहार अर्पण करून जेष्ठ शिवसैनिक गणपत साठे यांच्या हस्ते नारळ फोडून शुक्रवारी प्रचाराला सुरूवात करण्यात आली. ठोंबरेवाडी, जुना खंडाळा परिसर, रेल्वे गेट जवळ इंदिरा गांधी नगर येथे घरोघरी जाऊन महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मतदारांची भेट घेऊन परिचय पत्रकाचे वाटप केले. यावेळी शिवसेना, कॉग्रेस आय, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आजी, माजी पदाधिकारी नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडी, सेवादलच्या महिला पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

इतर बातम्या