Breaking news

लोणावळा नागरिकांना जाहीर सूचना | वलवण धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने अपुरा पाणीपुरवठा; काही दिवस पाणी जपून वापरा

लोणावळा : लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वलवण धरणांमधील पाणी पातळी कमी झाल्याने शहरातील काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे पंप चालवण्यासाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने पंप वारंवार बंद करावा लागत आहे याबाबत टाटा कंपनीचे व्यवस्थापक यांना कळविण्यात आले असून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने लोणावळा शहरातील नागरिकांनी पुढील काही दिवस पाणी जपून वापरावे व नगरपरिषदेकडून पाणी सोडल्यानंतर पाण्याची साठवणूक करून ठेवावी असे आवाहन लोणावळा नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

      लोणावळा शहराला टाटा कंपनीच्या वलवन धरणामधून पाणीपुरवठा केला जातो सध्या धरणातील पाण्याची पातळी जमिनीच्या लेवलला गेली आहे यामुळे अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पंप अखंडित चालवणे शक्य होत नसल्याने पंप बंद करावा लागत आहे याबाबत टाटा कंपनीला कळवण्यात आले असून कंपनीकडून शिरवता धरणांमधून वलवन धरणात पाणी घेण्यात येणार आहे याकरिता व पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे या कालावधीमध्ये उपलब्ध होणारा पाणीपुरवठा शहरात सोडण्यात येईल नागरिकांनी पाणी जपून वापरावे व साठवून ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे. शिरवता धरणा मधून वलवन धरणात पाणी आल्यानंतर स्थिर साठ्यातून पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे दरम्यानच्या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेने केले आहे.

इतर बातम्या