Breaking news

Lonavala : श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळ्यात युवासेनेची महत्वाची बैठक संपन्न

लोणावळा : महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळ्यात युवासेनेचे महत्वाची बैठक पार पडली. युवासेनेचे मावळ तालुका अधिकारी विशाल हुलावळे व लोणावळा युवासेना अधिकारी विवेक भांगरे यांनी युवा सैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी उपशहर प्रमुख अतिश भांगरे, सुधांशू शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने लोणावळा व ग्रामीण भागातील युवा सैनिक उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना प्रचाराची रणनीती कशी असावी तसेच कोणते मुद्दे घेऊन मतदारांच्या समोर जायचे याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.

इतर बातम्या