Breaking news

लोणावळा गावठाणात महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन; संजोग वाघेरे यांचे निवडणूक चिन्ह असलेली मशाल घराघरात पोहचवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज

लोणावळा : लोणावळा गावठाण भागात आज महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार करत त्यांचे प्रचार पत्रक व निवडणूक चिन्ह असलेली मशाल याबाबत मतदारांना माहिती देण्यात आली.

       लोणावळा शहर महाविकास आघाडी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, आम आदमी पार्टी यांच्या वतीने महाविकास आघाडी मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी आज नवव्या दिवसा लोणावळा शहराचे ग्रामदैवत असलेल्या गावठाणातील भैरवनाथ मंदिरात पुष्पहार व श्रीफळ वाढवून प्रचारास सुरुवात करण्यात आली. गावठाण परिसर, सिद्धार्थ नगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, बोहरी सोसायटी, वर्धमान सोसायटी व खोंडगेवाडी या भागात प्रचार करण्यात आला. महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी घरोघरी मतदारांची भेट घेऊन परिचय पत्रक वाटप करण्यात आले. लोणावळा शहरातील सर्व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडीच्या पदाधिकारी, सेवादलच्या महिला पदाधिकारी, युवा संघटनेच्या पदाधिकारी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोणावळा शहरातील महाविकास आघाडीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दिवसेंदिवस प्रचाराला मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा परिवर्तन घडविणार असल्याचा ठाम विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे.

इतर बातम्या