Breaking news

श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ एकवटल्या लोणावळा महायुतीच्या महिला

लोणावळा : मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळा शहरामध्ये महायुतीच्या महिला एकवटल्या आहेत. आज महायुतीच्या महिलांनी श्रीरंग बारणे यांचे लोणावळा शहरातील निवडणुकीचे मध्यवर्ती कार्यालयात येऊन त्यांचा कार्य अहवाल फडकवला तसेच घरोघरी जाऊन श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. 

      मावळ लोकसभेचे श्रीरंग बारणे हे दोन वेळा खासदार राहिले आहेत. आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची ही हॅट्रिकची संधी असल्याने त्यांना मावळ लोकसभेतून खासदार करण्यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व मावळात श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी भाजपा महिला आघाडी व महायुतीतील इतर घटक पक्षांच्या महिला यांनी कंबर कसली आहे. मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरांमध्ये महायुतीच्या माध्यमातून बारणे यांच्या कार्य अहवालाचे वाटप सुरू आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारसंघांमध्ये अनेक मान्यवरांच्या सभा देखील होणार आहेत. दरम्यानच्या काळामध्ये बारणे यांचे निवडणूक चिन्ह व कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचावा याकरिता कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. मागील दहा वर्षांमध्ये बारणे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देखील या भेटीदरम्यान मतदारांना दिली जात आहे.

इतर बातम्या