Breaking news

Maval News | मावळ विधानसभा मतदार संघात 53.02 टक्के मतदान; संपूर्ण मावळ लोकसभा मतदार संघात 52.9 टक्के मतदान

लोणावळा : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी 13 मे रोजी मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजता सुरूवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मावळ विधानसभा मतदार संघात 53.02 टक्के मतदान झाले होते. मावळ तालुक्यात यावेळी मतदानाचा टक्का घसरला आहे. तर संपूर्ण मावळ लोकसभा मतदार संघात 52.9 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पनवेल (49.21%), कर्जत (60.12%), उरण (64.75%), मावळ (52.9%), चिंचवड (49.43%), पिंपरी (48.25%) मतदान झाले आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण मतदार संघ म्हणून ओळखला जातो. लोणावळा व तळेगाव ही दोन शहरे वगळता बहुतांश ग्रामीण भागात विभागलेला आहे. यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ या दोन तासात केवळ 3.41 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर सकाळी 7 ते‌ 11 या कालावधीत 14.75 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 7 ते 1 या कालावधीत 28.30 टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी उन्हाचा कडाका असल्याने मतदारांनी दुपारी 1 ते 3 या कालावधीत घराबाहेर पडण्याचे टाळले असल्याचे चित्र मावळात होते. या दोन तासात केवळ 9 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तसेच काही शहरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच काही प्रमाणात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर काही मतदान केंद्रावर तुरळक प्रमाणात गर्दी होती. दुपारी चारनंतर उन्हाचे प्रमाण कमी झाले मात्र पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने मतदानावर परिणाम झाला. सायंकाळी 4.30 वाजता लोणावळा व ग्रामीण भागात हलका पाऊस झाला. त्यानंतर पाऊस उघडल्याने प्रत्येक केंद्रावर गर्दी झाली होती. 

      मावळात दोन ते तीन ठिकाणी काही तांत्रिक कारणांमुळे मतदान यंत्रे बदलण्यात आली. तर मावळात अनेक गावांतील मतदान यादीत नावांचा घोळ, अनेकांची नावे वगळली तर अनेक मतदारांची नावे हि वेगवेगळ्या मतदार केंद्रात समाविष्ट झाल्याने संबंधित मतदार हे आपआपल्या पारंपारिक मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्यावर त्या ठिकाणी त्यांचे सदर मतदान यादीत नाव नसल्याने संबंधित मतदार आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला होता. मागील काही दिवसांपासून मावळ विधानसभा मतदारसंघात कोण आघाडी घेणार यावर चर्चा सुरू होत्या. मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (महायुती) व संजोग वाघिरे (महाविकास आघाडी) यांच्यात प्रमुख लढत आहे. दोन्ही उमेदवार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अर्थात घाटावरील असल्याने या दोघांमध्ये घाटावरील तिन्ही विधानसभा मतदार संघासह घाटाखालील तिन्ही मतदार संघातील मतदान कोण कशी आघाडी 

सकाळी 7 ते 9 = 3.41% (12,733)

07 ते 11 = 14.75% (73,077)

07 ते 01 = 28.30% (1,05,674)

07 ते 03 = 37.50% (1,40,030)

07 ते 05 = 50.12% (1,87,152)

07 ते 06 = 53.02 % (1,97,981)

इतर बातम्या