Breaking news

कौतुकास्पद l 544 किमी सायकल प्रवास करत मावळातील सायकल वीरांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन

लोणावळा (Lonavala) : मावळ तालुक्यातील कांब्रे ते पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर ते कांब्रे असा 544 किमी सायकल प्रवास दोन दिवसात पूर्ण करत मावळातील सायकल वीरांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचे दर्शन घेतले.

        शनिवारी व रविवारी (8 व 9 जून) अशी सायकल वारी तरुणांनी पूर्ण केली. दोन दिवसात 544 किमीचा प्रवास होता. मावळ ॲथलिट असोसिएशन यांनी याचे आयोजन केले होते.  या मधील कांब्रे गावातील विठ्ठल गायकवाड आणि गणेश गायकवाड तर तळेगाव मधील सूरज जाठ आणि किशोर पाटील आणि पुणे येथून नितीन शिरसट हे तरुण सहभागी झाले होते. विठ्ठल नामाचे स्मरण, विठूरायाची ओढ आणि भक्ती करत असल्यामुळे हा प्रवास सुखरूप झाला असल्याचे या सायकल वीरांनी सांगितले. जसे वारकरी दरवर्षी वारीत विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला जातात त्या प्रमाणे हे तरुण जात असतात. या वर्षीचे हे तिसरे वर्ष होते. पांडुरंगाच्या दर्शना सोबत नागरिकांना या सायकल वारीतून निरोगी आरोग्याचा मंत्र देण्यात आला. तसेच सायकल चालवण्याने आरोग्य निरोगी राहते व स्नायू मजबूत होतात असा संदेश देण्यात आला.

इतर बातम्या