Breaking news

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते तीन कोटींच्या रस्त्यांचा भुमिपूजन समारंभ संपन्न

तळेगाव दाभाडे : नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कामे वित्त विभाग 2023 - 24 अंतर्गत शहरातील सुमारे तीन कोटी सात लक्ष रुपये निधीतील रस्त्यांच्या कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या शुभहस्ते रविवारी (9 जून) संपन्न झाला. उमंग सोसायटी ते बीएसएनएल पर्यंतचा रस्ता, एमएसईबी ते तत्व हॉटेलपर्यंत रस्ता आणि अथर्व हॉस्पिटल ते शेळके गार्डनपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे   ही कामे या निधीतून होणार आहेत.

      अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती. नागरिकांकडून सातत्याने मागणी होत असलेल्या या रस्त्यांच्या कामांना अखेर सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांकडून आमदार शेळके यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या भुमिपूजन समारंभास माजी नगरसेविका कल्पना भोपळे, सुरेश झेंडे, सागर पवार, मंगेश सरोदे, माजी जि.प.सदस्य अतिश परदेशी, चंद्रकांत थिटे, संतोष असवले तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, विकासात्मक दृष्टिकोनातून शहरातील कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण देखील झाले आहे. बॅलाडोर भागातील नागरिकांकडून रस्ता दुरुस्तीची सातत्याने मागणी होत होती. या अनुषंगाने तीन कोटीच्या निधीतून ही कामे मार्गी लागणार आहेत याचे मनस्वी समाधान आहे.

इतर बातम्या