Breaking news

राजकीय तज्ञ स्पर्धेत दत्तात्रय माळी व अश्विनी माळी प्रथम

शेलारवाडी (मावळ) : शेलारवाडी ता. मावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या राजकीय तज्ञ स्पर्धेत 48 पैकी 33 अचूक उत्तरे देऊन दत्तात्रय माळी व अश्विनी माळी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सुहास माळी, उमेश माळी, शुभांगी माळी, अंकुश माळी, अथर्व माळी यांनी 32 अचूक उत्तरे देऊन द्वितीय क्रमांक तर विशाल माळी यांनी 31 उत्तरे देऊन तृतीय क्रमांक संपादन केला. या स्पर्धेत पुरुषांबरोबरच महिलांनीही सहभाग घेतला होता.

      श्री संत सावता माळी मित्र मंडळ शेलारवाडी यांनी ही समस्त माळी परिवारासाठी स्पर्धा आयोजित केली होती. या मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धा, वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. प्रत्येकाने आपल्या कौटुंबिक जीवनाबरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्यरत रहावे तसेच राजकीय क्षेत्रातही जाणकार असावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे संयोजन नंदकुमार माळी, योगेश माळी, किशोर माळी, संजय माळी, तुषार माळी यांनी केले होते.

इतर बातम्या