Maval Big News l फास्ट टॅग च्या आडून वरसोली व सोमाटणे टोल नाक्यावर सुरू असलेली स्थानिकांची लूट थांबवा - आमदार सुनील शेळके
लोणावळा (Lonavala) : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली व सोमाटणे टोलनाका येथे फास्ट टॅग मधून स्थानिक नागरिकांच्या वाहनांचे पैसे घेतले जात आहेत. मावळ तालुक्यातील स्थानिकांना टोल आकारणी केली जाणार नाही असे सांगितले जात असेल तरी प्रत्यक्षात त्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन करून टोल आकारणी केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ही टोल वसुली तात्काळ बंद करावी अन्यथा 10 जून रोजी टोल नाके बंद करण्याचा इशारा मावळचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांनी दिला आहे.
सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून जनसेवा विकास समितीचे संस्थापक कै. किशोर आवारे यांनी सोमटणे टोल नाका हटवण्यासाठी मोठा लढा उभा केला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मावळ तालुक्यातील स्थानिकांना टोल वसुली मधून पुढील निर्णय होईपर्यंत सूट दिले जाईल असे आश्वासन दिले होते. काही काळ या आश्वासनाची पूर्ती झाली गेली मात्र मागील महिन्यात दोन महिन्यापासून पुन्हा या टोल नाक्यांवर स्थानिक वाहनांच्या फास्टट्रॅक मधून पैसे कपात होऊ लागले आहेत. याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या आहेत. ज्या स्थानिकांच्या खात्यामधून पैसे कपास झाले आहेत त्यांनी संबंधित टोलनाका व्यवस्थापनाशी संपर्क साधल्यास त्यांचे पैसे पुन्हा परत केले जाईल असे सांगितले जात आहे. मात्र वास्तविक पाहता या सर्व गोष्टी किचकट स्वरूपाच्या व वेळ खाऊ असल्याने सोमाटणे टोल नाका व वरसोली टोलनाका या दोन्ही ठिकाणी स्थानिक वाहनांच्या फास्ट ट्रॅग मधून होत असलेली टोल वसुली तात्काळ थांबवावी अन्यथा येत्या 10 जून रोजी दोन्ही टोलनाके बंद केले जातील असा इशारा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.