Breaking news

Lonavala News l संविधान गौरव समिती च्या अध्यक्ष पदी दत्तात्रय येवले यांची एकमताने निवड

लोणावळा : भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने लोणावळा शहरात संविधाना चा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या करिता संविधान गौरव समिती स्थापन करण्यात आली असून या समिती च्या अध्यक्ष पदी प्रख्यात वास्तुविशारद व माजी नगरसेवक दत्तात्रय येवले यांची एक मताने निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष पदी मा. नगरसेवक नासिर शेख यांची निवड घोषित करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी मध्ये निखिल कविश्वर, बापुलाल तारे, नारायण पाळेकर, ललित सिसोदिया, गणेश गायकवाड, प्रविण कांबळे आदी मान्यवरांचा सहभाग असून इतर धर्मियांना देखिल कार्यकारणी मध्ये सामावून घेण्यात येणार आहे.

      आज झालेल्या संविधान गौरव समिती च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याप्रसंगी संजय अडसुळे, यमुना साळवे, मालन बनसोडे, सुनिता भालेराव पाटील, सीमा देसाई, कमलशिल म्हस्के, मधुकर भालेराव, विजय जाधव, सुनिल यादव, यशवंत जाधव, रविंद्र जाधव, राघू भालेराव, सलिम शेख, मोहन जगताप, गौतम सपकाळ, भागुजी शिंदे, निरंजन कांबळे, सुभाष रेड्डी, जयराम कदम, मिलींद भालेराव, रमेश भालेराव, शैलेश ओव्हाळ, सुनिल सोनवणे, शाम भालेराव, संजय सांळुखे आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती संविधान गौरव समारंभ चे प्रवर्तक आणि संविधान गौरव समितीचे मुख्य निमंत्रक सूर्यकांत वाघमारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

इतर बातम्या