Breaking news

दुःखद घटना l लोणावळा शहरातील वलवन धरणात बुडून सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू

लोणावळा : लोणावळा शहरातील वलवन धरणात बुडून एका सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज घडली आहे. मुलगा पाण्यामध्ये बुडाला असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा शहरातील शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाने वलवन धरण या ठिकाणी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करत सदर मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे.

       निलेश शिंदे (राहणार कासरवाडी पुणे

 अंदाजे वय 17 वर्ष) असे या पाण्यात बुडून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. तो त्याच्या 12 मित्रांबरोबर लोणावळ्यात फिरायला आला होता. वरसोली येथून वलवण धरणाच्या मागील बाजूला ते गेले होते. त्या ठिकाणी धरणाच्या पाण्यामध्ये ते पुण्यासाठी उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे निलेश शिंदे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

       या घटनेची माहिती मिळता क्षणी शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथक सर्व साहित्यसह घटनास्थळी दाखल झाले. पाणबुडी च्या साह्याने शोध मोहीम राबवत मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयूर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडू, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश सगर, सुनील गायकवाड यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या राबवली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.


इतर बातम्या

पोलिसांच्या डोळ्यासमोर दरोडेखोर पळाले; … पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करा - लोणावळ्यातील सर्व पक्षीय नेत्यांची मागणी