Breaking news

डोंगरगाव वाडी येथे बनविलेला रस्ता ठरतोय स्थानिकांसाठी डोकेदुखी; अंतर्गत रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे झालंय मुश्किल

लोणावळा : डोंगरगाव वाडी येथे दोन महिन्यापूर्वी बनविण्यात आलेला रस्ता हा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरु लागला आहे. सदरचा रस्ता बनविताना त्यांची उंची जास्त घेतली गेल्याने आजुबाजूच्या घरांचे रस्ते खाली गेले आहेत. 25 मी रोजी झालेल्या पावसात ही आजूबाजूचे रस्ते पाण्याखाली गेले असून आज देखील त्या रस्त्यावर पाणी साचून राहिले आहे. रस्त्याचे काम सुरू असताना येथील रहिवाशी गणेश काळे यांनी पाणी जाण्यासाठी पाईप टाका अन्यथा पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले गेल्याने पहिल्याच पावसात या अंतर्गत रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. या रस्त्यावर जाताना येताना येथील रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. लहान मुलांनी या पाण्यातून शाळेत कसे जायचे, आताच याठिकाणी पाणी जाण्यासाठी मोरी अथवा पाईप न टाकल्यास नागरिकांना पावसाचे चारही महिने हा त्रास सहन करावा लागणार आहे.

    याप्रकरणी मृण्मयी गणेश काळे या लहान मुलीने डोंगरगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन व प्रत्यक्ष ठिकाणचे फोटो देत कारवाईची मागणी केली आहे. ग्रामपंचायत पथकाने येथे पाहणी देखील केली मात्र अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे सौ. काळे यांनी सांगितले.



इतर बातम्या

पोलिसांच्या डोळ्यासमोर दरोडेखोर पळाले; … पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करा - लोणावळ्यातील सर्व पक्षीय नेत्यांची मागणी