Breaking news

रायवुड येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

लोणावळा : लोणावळा शहरातील रायवुड येथे श्री सिद्धीविनायक गणेश मंदिर जिर्णोध्दारचे काम पूर्ण झाल्यानंतर 23 मे रोजी मंदीराचे कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठया उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. यानिमित्त 16 मे ते 23 मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाले. पं. आतुल शास्त्री भगरे गुरूजींनी श्रीमत् भागवत कथेचे सादरीकरण केले. श्री रायवुड गणेश मंडळाचे यंदा 99 वे वर्षे आहे. शताब्दी वर्षाचे औचत्य साधुन मंडळाच्या कार्यकत्यांनी जुण्या जिर्ण झालेल्या मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचा संकल्प केला होता ती पूर्णत्वास गेला आहे. दीड वर्षपूर्वी या कामाला सुरुवात करण्यात आली होती.

     आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत संजयगीरीजी महाराज उर्फ लहरीबाबा यांच्या शुभहस्ते मंदिराचा कळस बसविण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विलास बडेकर, मावळ-मुळशी भुषण सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, बांधकाम व्यवसायिक दिनेश राणावत आदी देखील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मंदिर वास्तुशांती व ध्वजस्तंभ पुजन तसेच ध्वजरोहन करण्यात आले. मंदिरात श्री गणपती बाप्पा, उंदीर मामा, कासव या मुर्त्या बसविण्यात आल्या आहेत. अतिशय सुंदर व देखणे असे हे मंदिर बांधण्यात आले आहे.

        आमदार सुनील शेळके, स्थानिक बंगले मालक, देणगीदार, अनेक दानशुर व्यक्तीं, ग्रामस्थ यांच्या लोकसहभागामुळे मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम यशस्वी रित्या पार पडले. हे मंदिर अत्यंत आकर्षक व सुंदर झाले असुन भाविकांच्या मनाला समाधान देणारे ठरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक माळी कामगारांकडून या गणेश मंडळाची स्थापना सन 1927 साली करण्यात आली. लोणावळा शहरातील मानाचा पहिला सार्वजनिक गणेशउत्सव म्हणून हे मंडळ उदयास आले. लोणावळा व मावळ पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला.

    श्री रायवुड गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते व परिसरातील सर्व माळी वर्ग आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.

इतर बातम्या

पोलिसांच्या डोळ्यासमोर दरोडेखोर पळाले; … पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करा - लोणावळ्यातील सर्व पक्षीय नेत्यांची मागणी