मोफत मोतीबिंदू शिबिर l श्री स्वामी समर्थ जनकल्याण केंद्र नांगरगाव येथे 4 जून रोजी मोफत मोतीबिंदू शिबिर

लोणावळा : श्री स्वामी समर्थ जनकल्याण केंद्र नांगरगाव या ठिकाणी 4 जून रोजी मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आर. झुनझुनवाला, शंकरा आय हॉस्पिटल पनवेल आणि श्री स्वामी समर्थ जनकल्याण केंद्र नांगरगाव यांच्या संयुक्त सहकार्यातून वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
4 जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ जनकल्याण केंद्र नांगरगाव या ठिकाणी हे शिबिर होणार आहे. मोतिबिंदू चे ऑपारेशन साठी येताना सोबत रेशन कार्ड आणि आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत घेऊन येणे तसेच बीपी शुगर चे गोळ्या चालू असतील तर घेऊन येणे क्रमप्राप्त आहे. लोणावळा व परिसरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.