Breaking news

Mumbai Pune Expressway : प्रवासी वाहनांची संख्या वाढल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा वेग मंदावला


लोणावळा : गणेश उत्सवाच्या निमित्त कोकण भागात जाणारे भाविक भक्त तसेच कोल्हापुर, सांगली, सातारा भागात जाणारे नागरिक मोठ्या संख्येने खाजगी प्रवासी वाहनांमधून निघाल्याने रात्रीपासून मुंबई पुणे एक्सप्रेस चा वेग मंदावला आहे. पुणे लेनवर आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट दरम्यान घाट भागात वाहनांची गर्दी झाली असून मंद वेगाने वाहने पुढे सरकर आहेत. खंडाळा घाटातील ही वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा महामार्ग पोलीस व बोरघाट पोलिसांची टिम महामार्गावर वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहे. मात्र वाहनांची संख्याच जास्त असल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

इतर बातम्या