वरसोलीतील विद्यार्थ्यांना वह्या आणि चिक्कीचे वाटप; स्पर्श फाऊंडेशन आणि औद्योगिक वसाहतीचा उपक्रम

लोणावळा : वरसोली आज ग्रामपंचायत शाळा वरसोली येथे कै. प्रमोदजी तिवारी यांच्या स्मरणार्थ आणि स्पर्श फाऊंडेशनच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच लोणावळा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष श्री. संदीप कोराड यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चिक्की वाटण्यात आली.
या उपक्रमात वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय खांडेभरड, शुभदा पॉलिमरचे मॅनेजर बावीस्कर, एचआर मॅनेजर प्रसन्न कदम, ग्रामपंचायत सदस्य नारायण कुटे, ग्रामसेवक दीपक शिरसाट, तसेच लोणावळा शिक्षण मंडळाचे उपसभापती प्रदीप थत्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक रवींद्र इथापे यांनी केले.