Breaking news

लोणावळा दहीहंडी महोत्सव समिती व मावळ वार्ता फाउंडेशन च्या वतीने वाहतूक पोलिसांना छत्र्या वाटप

लोणावळा : लोणावळा दहीहंडी महोत्सव समिती व मावळ वार्ता फाउंडेशन यांच्या वतीने लोणावळा वाहतूक पोलिसांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. लोणावळा शहरामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामध्ये लोणावळा वाहतूक पोलीस व वाहतूक वॉर्डन, होमगार्ड हे वाहतूक नियोजनाचे काम करत आहेत. याकरता त्यांना मदत म्हणून लोणावळा शहर दहीहंडी महोत्सव समिती व मावळ वार्ता फाउंडेशन च्या वतीने सदरच्या छत्र्या वाटप करण्यात आले आहे. लोणावळा शहर महोत्सव समितीचे अध्यक्ष रमेश पाळेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. 

         लोणावळा शहर वाहतूक पोलीस चौकी कुमार चौक या ठिकाणी वाहतूक पोलीस व वॉर्डन यांना सदर छत्र्या देण्यात आल्या. यावेळी लोणावळा शहर दहीहंडी महोत्सव समितीचे अध्यक्ष रमेश पाळेकर, मावळ वार्ता फाउंडेशन चे संचालक संजय अडसुळे, सेक्रेटरी मनीषा बंबोरी, खजिनदार संदीप वर्तक, संचालक व उद्योजक गिरीश पारेख यांच्यासह लोणावळा शहर वाहतूक विभागाचे पोलीस हवलदार अनिल शिंदे व ऑर्डर उपस्थित होते.

इतर बातम्या