Breaking news

माजी आमदार स्वर्गीय कृष्णराव भेगडे यांना लोणावळा शहरांमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली

लोणावळा : मावळ तालुक्याचे माजी आमदार व मावळ तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, वैद्यकीय विकासाचे केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेले स्वर्गीय कृष्णराव भेगडे यांना लोणावळा शहरामध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने येथील महिला मंडळ हॉलमध्ये या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

      यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, भाजपा गटनेते देविदास कडू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, भारतीय जनता पार्टीचे लोणावळा शहराध्यक्ष अनिल गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख संजय भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष परेश बडेकर, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष उमा मेहता, वंचित बहुजन आघाडीचे संजय कांबळे, माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई टेलर कल्याणजी, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, भाजपा माजी शहराध्यक्ष अरुण लाड, माजी नगरसेवक ॲड. संजय गायकवाड, माजी नगरसेवक दत्तात्रय येवले, बाबा शेट्टी, दादा धुमाळ, गणेश गवळी, आरोही तळेगावकर, मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विशाल विकारी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर, प्रशांत पुराणिक, ज्येष्ठ नेते गणेश भाऊ गायकवाड, रामभाऊ थरकुडे, जाकीर भाई खलिफा,पंकज खोले, मुकुंद घनवट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

      उपस्थित सर्वच मान्यवरांनी माजी आमदार स्वर्गीय कृष्णराव भेगडे यांच्या विषयी आपल्या सदभावना व्यक्त केल्या. अगदी जनसंघाचे सदस्य व जनसंघाचे आमदार ते पुढे काँग्रेसचे आमदार जिल्ह्याचे नेते अशा विविध भूमिका बजावत असताना मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू मानत ज्यांनी काही दशके मावळ तालुक्याच्या विकासाला चालना दिली याविषयीच्या आठवणी व भावना यांना उजाळा दिला. विकासाची दूरदृष्टी असणारा नेता कसा असावा तर स्वर्गीय आमदार कृष्णाराव भेगडे हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण होते असे सर्वच मान्यवरांनी विशद केले.

इतर बातम्या