Breaking news

Lonavala Rain Information l मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर लोणावळ्यातील पावसाचा जोर ओसरला; मागील 24 तासात जेमतेम 8 मिमी पाऊस

लोणावळा : पुणे व रायगड जिल्ह्यात तसेच घाटमाथा परिसरात 6 ते 10 जुलै दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र या इशारानंतर लोणावळा घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला आहे. लोणावळ्यात सोमवारी (7 जुलै) 16 मिमी तर मंगळवारी (8 जुलै) रोजी 8 मिमी पाऊस झाला आहे. मागील काही दिवसांपासून जोरदार सुरू असलेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या अखेरपासून सुरू असलेल्या पावसाने जून महिन्यात देखील जोरदार बॅटिंग केल्यामुळे यावर्षी लोणावळा शहरात आज अखेरपर्यंत 2639 मिमी (103.90 इंच) एवढा पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत 1135 मिमी (44.69 इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आजपर्यंत 1504 मिमी इतका अधिकचा पाऊस झाला आहे.

इतर बातम्या