Breaking news

आनंदवार्ता l श्री एकवीरा विद्या मंदिर, कार्ला यांचा गुणवत्ता अभियानात तालुकास्तरावर गौरव

कार्ला (ता. मावळ) : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित "गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५" अंतर्गत मावळ तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या शाळा स्पर्धेत श्री एकवीरा विद्या मंदिर, कार्ला या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावून मानाचा सन्मान मिळवला.

गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या उपस्थितीत या शाळेचा गौरव करण्यात आला. मावळ तालुक्यातील एकूण ८८ शाळांचे विविध निकषांवर मूल्यांकन करण्यात आले होते, ज्यात श्री एकवीरा विद्या मंदिराने आपले विशेष स्थान निर्माण केले.

शाळेने भौतिक सुविधा, परीक्षेतील गुणवत्ता, शालेय स्पर्धांतील सहभाग, पर्यावरण पूरक उपक्रम, विविध विभागांचे व्यवस्थापन तसेच गुणवत्ता वृद्धीसाठी केलेले प्रयत्न या सर्वच निकषांवर उजवा ठसा उमठवला.

या यशाबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, सर्व संचालक मंडळ, आजी-माजी विद्यार्थी व पालकवर्ग यांनी शाळेचे मुख्याध्यापक संजय वंजारे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

इतर बातम्या